Good Morning Kavita Marathi 2022
Good Morning Kavita Marathi |
Good Morning Kavita Marathi ( good morning marathi kavita) या सर्व कविता या सकाळच्या निसर्गरम्य वातावरणावर तसेच सकाळच्या गोड आठवणींवर आधारित आहेत. (Good Morning Quotes in Marathi) म्हणून मी आज तुमच्या साठी Good Morning Kavita Marathi हा लेख घेऊन आलो आहे.आणि हो तुम्ही Jivnavar Status in Marath हे पण वाचू शकतात
या सर्व Good Morning Quotes Marathi Motivation माध्यमातून सकाळच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Good Morning Poem in Marathi
शुभ सकाळ ही माझी तुझ्या
हसऱ्या चेहऱ्याने व्हावी...
शुभ सकाळ
शुभ सकाळ ही माझी तुझ्या
गोड गोड शब्दांनी व्हावी...
शुभ सकाळ
शुभ सकाळ ही माझी
तुलाचं पाहून व्हावी...
शुभ सकाळ
अंधातरी शब्दांची
माळ ओवून व्हावी...
तुला फक्त मी शुभ सकाळ म्हणावी
हे पण वाचा:-
- मतलबी मराठी लायकी टोमणे इन मराठी
- 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
- Success प्रेरणादायक मोटिवेशनल कोट्स in हिंदी
- Gulzar Quotes on Relationship in Hindi
- Gulzar shayari in Hindi 2 lines on Smile
- Hindi Shayari Likha Huwa Copy Attitude
- Good Morning Quotes Marathi Motivation
- Heart Touching Shayari of Gulzar in Hindi
- Best Short Captions for Instagram for Boys
- Gulzar Quotes on Life for Instagram in Hindi
- Famous Success Motivational Quotes for Students
Good Morning Poems in Marathi | good morning kavita in marathi
शुभ सकाळ मराठी कविता
सगळे गेले रजेवर
घेऊन आले नवी शुभ सकाळ
शुभ सकाळ
चंदा गेला, चांदणे गेले
उगवली आहे शुभ सकाळ
तुम्हांला देतो मी शुभेच्छा
शुभ सकाळ
प्रकाशाने अंधारावर पुन्हा: केली आहे मात
शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ
शुभ सकाळ
गुलाबी ही सकाळ
नेसूनी आली पिवळा शालू
थवा पाखराचा आकाशी
लागला भिरभिरू
कोकिळाही गाते गाणे
ऐक माझ्या साजना
रोज रात होताना
घेऊनी ये नव्या आशेच्या
शुभ सकाळ...
शुभ सकाळ मराठी कविता
कोकिळेचे गीत आहे मधूर जरी
सकाळच्या प्रहरी शांतता
हसली हि लाजरी
आहे लाजरा मुखडा
हळुवार पसरतो दाही
रंगउधळीत येते स्वप्नपालवी घरी
शुभ सकाळ
ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
शुभ सकाळ
ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
"खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात...
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना.. शुभ सकाळ
शुभ सकाळ
हे पण वाचा:-
Good Morning Quotes in Marathi
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
|| शुभ सकाळ ||
पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्यासाठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे?
" मैत्री " मैत्रीच नांत कस जगावेगळ असत,
रक्ताचं नसल तरी मोलाच असत...
आपला दिवस आनंदाचा जाओ
शुभ सकाळ
यश हे सोपे,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!
शुभ सकाळ
"मातीने" एकी केली तर विट बनते..,
"विटेनी" एकी केली तर भिंत बनते..,
आणि जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत...नाही का...
"विचार" असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार" केलाच पाहिजे.
शुभ सकाळ
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल...
|| शुभ सकाळ ||
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ
Good morning WhatsApp msg in Marathi
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो " कचरा " साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा...
शुभ सकाळ
पहिला नमस्कार
परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली
दुसरा नमस्कार
आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला
तिसरा नमस्कार
गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली
चौथा नमस्कार
आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही.
शुभ सकाळ
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....
कोणाचा अपमान करू नका
आणि कोणाला कमीही लेखू नका.....
तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....
कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा
महान बनण्याचा क्षण देत नाही.......
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना
मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......
शुभ सकाळ
हे पण वाचा:-
Post a Comment